मुंबई : आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांचे अध्यक्षतेखाली मंत्रालयात राज्यातील असंसर्गजन्य रोगांच्या व कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे करीता बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला डॉ. तानाजी सावंत सार्वजनिक मंत्री (आरोग्य विभाग) , मैत्रीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रविण परदेशी, श्री.मिलिंद म्हैसकर अति. मुख्य सचिव (सार्वजनिक आरोग्य विभाग), श्री. धीरज कुमार आयुक्त आरोग्यसेवा, आशियाई डेव्ह्लप्मेंटल बँकचे पदाधिकारी, श्री.रणधीर सूर्यवंशी, खाजगी सचिव, श्री.अशोक आत्राम, सह सचिव, डॉ.विजय कंदेवाड, सहसंचालक, डॉ. विजय बाविस्कर, सहसंचालक, डॉ. माधुरी काळे, सहा. संचालक, डॉ. राहुल सोनवणे, टाटा मेमोरियल रुग्णालय उपस्थित होते.
सदर बैठकीत संसर्गजन्य आजाराच्या मुळे होणारे मुत्युचे प्रमाण हे कमी होत असून असंसर्गजन्य आराच्यामुळे होणारे मृत्यूचे प्रमानात वाढ झाली आहे तसेच कोविड आजाराच्या प्रदुर्भावात झालेल्या मृत्युच्या तुलनात्मक अवलोकनात असंसर्गजन्य रोग आजार असलेल्या रुग्णातील मृत्यूचे प्रमाण हे अधिक असल्याचे आढळून आले आहे तसेच राज्यातील मुख्यत्वे आढळून येणारे कर्करोगात तोंडाचा कर्करोग, स्तानाचा कर्करोग आणि गर्भाशय मुख कर्करोगाचा प्रादुर्भाव जास्त आहे.
सदर कर्करोगाचे निदान हे आजाराच्या प्राथमिक टप्प्यात केल्यास कर्करोग बरा होवू शकतो. कर्करोगाचे निदान प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर करणे करिता सार्वजनिक आरोग्य विभागाचे बळकटीकरण करण्यासाठी आशियाई डेव्ह्लप्मेंटल बँक बरोबर समन्वय करणे आणि राज्यात नव्याने रेडियोथेरपी उपचार रुग्णालये हब आणि स्पोक तत्वावर सुरु करण्याकरिता वैद्यकीय महाविद्यालये आणि सार्वजनिक आरोग्य विभाग आरोग्य संस्थांचे अवलोकन करण्यात यावे यावर सकारात्मक चर्चा झाली.
कर्करोग नियंत्रण आणि प्रतीबंधाबाबत राज्यात धोरणात्मक उपाय योजनेकरिता आशियाई डेव्ह्लप्मेंटल बँक आणि सार्वजनिक आरोग्य विभाग समन्वयाने काम करणार आहेत.