Menu Close

प्रलंबित विषयांचा आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याकडून आढावा

पुणे/मुंबई: राज्यातील शासकीय आरोग्य संस्थांकरिता लागणाऱ्या वैद्यकीय बाबींच्या खरेदीसाठी फेब्रुवारी, २०२३ मध्ये नव्याने मंजूर करण्यात आलेल्या “महाराष्ट्र वैद्यकीय वस्तु खरेदी प्राधिकरण” तात्काळ कार्यान्वित करणे व हाफकिन खरेदी कक्ष यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा प्रा.डॉ.तानाजी सावंत, आरोग्य मंत्री यांनी आढावा घेतला.

यावेळी आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार, अन्न व औषध प्रशासन आयुक्त तथा हाफकिन खरेदी कक्षाचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, सहसंचालक डॉ. गौरी राठोड व इतर संबंधित अधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती.

या बैठकीत “महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण” तात्काळ कार्यान्वित करण्याच्या सूचना देवून, आगामी पर्जन्यकाळात आरोग्य संस्थांमध्ये पुरेसा औषध साठा उपलब्ध करून देण्यासाठी प्राधिकरणाच्या माध्यमातून त्वरीत कामकाज सुरू करण्याचे निर्देश आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिले.

याशिवाय, हाफकिन खरेदी कक्षाकडे उपलब्ध असलेली अखर्चित रक्कम परत करण्याची कार्यवाही करावी आणि आजपासून पुढील खरेदीची कार्यवाही प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीस आरोग्य विभागातील संबंधित कार्यक्रम प्रमुख दृकश्राव्य पद्धतीने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *