




Blog
Web Banner 1
Web Banner
Web Banner 2
Web Banner 4
महा आरोग्य ब्लॉग
यांत्रिक पद्धतीने वस्त्र धुलाई सेवा प्रकल्पामुळे रुग्णालयीन आरोग्य सेवेचा दर्जा उंचावणार – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
राज्यातील ५९३ आरोग्य संस्थांमध्ये यांत्रिक पद्धतीने वस्त्र धुलाई सेवेचा शुभारंभ मुंबई – राज्यातील ५९३ शासकीय रुग्णालयांमध्ये स्वच्छता, सुरक्षितता आणि निर्जंतुक सेवा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने…
No Comments
पूरस्थितीत आरोग्य विभाग सज्ज : नागरिकांना अखंडित आरोग्य सेवा देण्याच्या आरोग्य मंत्र्यांच्या सूचना
पूरस्थितीत आरोग्य विभाग सज्ज : नागरिकांना अखंडित आरोग्य सेवा देण्याच्या आरोग्य मंत्र्यांच्या सूचना मुंबई – राज्यात सध्या सर्वत्र सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती…
No Comments
गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा
गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी प्रकाश आबिटकर, मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मुंबई – राज्यातील स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्यासाठी आणि…
No Comments
Facebook Posts
15 hours ago
आरोग्य जनजागृती उपक्रमांना गती देण्यासाठी आढावा बैठक![]()
#पुणे – राज्यातील विविध आरोग्य कार्यक्रम आणि योजनांचा प्रभावी प्रसार करून त्या अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग, पुणे येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला राज्यातील सर्व जिल्ह्यांतील विस्तार व माध्यम अधिकारी (#demo) उपस्थित होते. ![]()
राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाचे उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर, डॉ. भगवान पवार, उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे, तसेच सहायक संचालक डॉ. संजयकुमार जठार बैठकीला उपस्थित होते. या वेळी राज्यातील आरोग्य जनजागृती उपक्रम, जनसंपर्क मोहिमा, तसेच माध्यमांशी प्रभावी संवाद यावर सविस्तर चर्चा झाली.![]()
संचालक डॉ. कंदेवाड यांनी आरोग्य विभागाच्या विविध योजना आणि उपक्रम जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी नावीन्यपूर्ण माध्यम धोरण आखण्याची सूचना केली. त्यांनी सांगितले की, आरोग्य विषयक माहिती जनसामान्यांना सुलभ भाषेत आणि आकर्षक पद्धतीने दिली गेल्यास त्यांचा आरोग्य विषयक जागरूकतेत मोठी भर पडेल. प्रसारमाध्यमांशी सकारात्मक आणि सातत्यपूर्ण संपर्क राखणे, तसेच आरोग्याशी संबंधित नकारात्मक किंवा गैरसमज निर्माण करणाऱ्या बातम्यांना योग्य प्रत्युत्तर देऊन तथ्य मांडणे, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सर्व जिल्हा माध्यम अधिकार्यांना समाज माध्यमांचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना दिल्या. विभागाच्या अधिकृत समाज माध्यम खात्यांवरील फॉलोअर्स वाढविण्यासाठी समन्वयित प्रयत्न करावेत, अशी सूचनाही त्यांनी केली. ![]()
आरोग्य जनजागृती हा केवळ विभागाचा कार्यक्रम नसून तो एक सामाजिक जबाबदारीचा भाग आहे. प्रत्येक अधिकाऱ्याने त्यासाठी सक्रिय भूमिका बजावली पाहिजे, अशी अपेक्षा बैठीकीचा समारोप करताना डॉ. बाविस्कर यांनी व्यक्त केली. ![]()
या बैठकीत जिल्हा स्तरावर राबविल्या जाणाऱ्या आरोग्य विषयक जनजागृती उपक्रमांचे अनुभव, अडचणी व यशोगाथा यांची देवाणघेवाण करण्यात आली. जनतेत आरोग्यविषयक जागरूकता वाढविण्यासाठी सर्व स्तरांवर माहिती-प्रसार मोहिमा अधिक सशक्त करण्यावर भर देण्यात आला.![]()
#HealthAwareness #IEC #healtheducation #media #communityengagement #healthpromotion #ReviewMeeting #PublicHealthDepartment #GovernmentOfMaharashtra
… See MoreSee Less

