Menu Close

आरोग्य योजना

आरोग्य सेवा व योजना - एक दृष्टीक्षेप

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना

  • योजना प्रारंभ – दि. २३.०९.२०१८
  • लाभार्थी – सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणना २०११ मध्ये समाविष्ट ७२ लक्ष कुटुंबे
  • विमा संरक्षण – प्रति कुटुंब प्रति वर्ष रु. ५ लक्ष रकमेचे  अंगीकृत शासकीय व खाजगी रुग्णालयात मोफत उपचार
  • उपचारांची संख्या – महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील ९७१ उपचारांसह‍ एकूण १३००(९७१+३२९ ) उपचारांचा समावेश
  • लाभाची अनुज्ञेयता – सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणनेत नोंद झालेल्या लाभार्थ्याना संगणकीकृत ई-कार्डस व फोटो ओळखपत्राच्या आधारे लाभ
  • अनुदान – योजनेच्या एकूण खर्चापैकी ६० टक्के रक्कम केंद्र शासन व ४० टक्के रक्कम राज्य शासन अदा करीत आहे
  • इतर राज्यातील लाभार्थी कुटुंबे महाराष्ट्रामध्ये योजनेचा लाभ घेऊ शकतात व महाराष्ट्रातील  लाभार्थी देखील इतर राज्यात लाभ घेऊ शकतो
  • दावे अदा कार्यपध्दती – एकूण रु.5 लक्ष विमा संरक्षणापैकी रु. ५ लक्षापर्यंतचे दावे विमा कंपनीमार्फत व रु. १.५ लक्षावरील ते रु. ५ लक्षापर्यंतचे दावे राज्य आरोग्य हमी सोसायटीकडून हमी तत्त्वावर अदा करण्यात येत आहेत
  • टोल फ्री क्र. १४५५५ /१८००-१११-५६५ वेबसाइट – pmjay.gov.in

कर्करोगाविरुद्ध लढाई

  • महाराष्‍ट्र राज्‍यामध्‍ये ओरल कॅन्‍सर, सर्वायकल कॅन्‍सर आणि ब्रेस्‍ट कॅन्‍सर हे तीन सर्वात जास्‍त आढळणारे कर्करोग
  • या तीन कर्करोगांचे एकूण कर्करोगांच्‍या ६० % प्रमाण आणि वेळीच निदान झाल्‍यास हा आजार १०० % बरा होण्‍याची शक्‍यता
  • गॅटस् २ अहवालानुसार राज्‍यामध्‍ये ३५ % पुरुष आणि १७ % स्त्रिया तंबाखूजन्‍य पदार्थ वापरतात
  • राज्‍यामध्‍ये अंदाजे २०,०००  ओरल कॅन्‍सर चे रुग्‍ण
  • राज्यस्तरावर २०१७ पासून मौखिक आरोग्य तपासणी अभियाना अंतर्गत सुमारे १४ कोटी लोकांची घरभेटीव्‍दारे आशा, एएनएम, एमपीडब्ल्यू यांचे मार्फत मौखिक आरोग्य तपासणी झाली
  • घरातील प्रत्‍येक व्‍यक्‍तीस मौखिक आरोग्‍याचे आणि तंबाखू दुष्‍परिणामाचे आरोग्‍य शिक्षण
  • कर्करोगपूर्व लीजन असल्याचे संशयित रुग्ण ज्यांना पुढील तपासणी आणि उपचारांसाठी संदर्भित केले अशांची संख्या: २,६२,४३१

आपत्‍कालीन सेवा

  • आपत्‍कालीन परिस्थितीत रुग्‍णांना वेळेत उपचार मिळावा यासाठी ९३७ रुग्‍णवाहिका, ३ तरंगती रुग्‍णवाहिका
  • रुग्‍णवाहिका जावू शकत नाही अशा शहरी आणि दुर्गम आदिवासी भागासाठी ३० मोटरबाईक वरील डॉक्‍टरांमार्फत प्राथमिक उपचार व आवश्‍यकता भासल्‍यास संदर्भ सेवा
  • यासाठी पुणे येथे सुसज्‍ज अद्ययावत मध्‍यवर्ती नियंत्रण कक्ष कार्यरत
  • प्रत्‍येक रुग्‍णवाहिकेमध्‍ये प्रशिक्षित डॉक्‍टर उपलब्‍ध. यामुळे जागेवर आणि प्रवासात रुग्‍णावर उपचार शक्‍य
 
 

आयुष्मान भारत: आरोग्यवर्धिनी केंद्र

  • गरोदरपणा आणि बाळंतपणातील काळजी
  • नवजात शिशू आरोग्य सेवा
  • बालके आणि किशोरवयीन मुला-मुलींसाठी आरोग्य सेवा
  • कुटुंब नियोजन, गर्भनिरोधक आणि इतर प्रजनन आरोग्य सेवा
  • साथरोगांसंबंधी सेवा: राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम
  • लहान आजरांसाठी बाह्यरुग्ण सेवा
  • असंसर्गजन्य रोगांसाठी स्क्रीनिंग, प्रतिबंधात्मक, नियंत्रण आणि उपचार सेवा
  • सामान्य नेत्र आणि कान-नाक-घसा यांचे आजारांसंबंधी सेवा
  • मूलभूत मौखिक आरोग्य सेवा
  • वृद्ध आणि उपशामक (palliative) आरोग्य सेवा
  • आपत्कालीन वैद्यकीय सेवा (burns आणि trauma)
  • मूलभूत मानसिक विकारांसाठी स्क्रीनिंग आणि प्राथमिक उपचार सेवा
  • योगा आणि इतर आयुष सेवा

गुणवत्‍तापूर्ण आरोग्‍य सेवा

  • सार्वजनिक आरोग्‍य विभागांतर्गत रुग्‍णालयांमध्‍ये उपचार घेणा-या जनतेला गुणवत्‍तापूर्ण आरोग्‍य सेवा मिळण्‍यासाठी खाजगी सेवा पुरवठादारांमार्फत उपकरणे देखभाल दुरुस्‍ती आणि वैद्यकीय चाचण्‍या
  • उपकरणांची देखभाल नियमितपणे होत असल्‍यामुळे उपकरणे बंद होण्‍याचे प्रमाण नगण्‍य व त्‍यामुळे रुग्‍णांच्‍या तपासण्‍या रुग्‍णालयातच शक्‍य
  • पीसीआर, एन्‍झायिम, हार्मोन इ. सारख्‍या विशिष्‍ट चाचण्‍या प्रथमच शासकीय रुग्‍णालयामध्‍ये उपलब्‍ध
  • वैद्यकीय चाचण्‍या नियमितपणे उपलब्‍ध झाल्‍यामुळे रुग्‍णाचे निदान, उपचारादरम्‍यान होणारी गुंतागुंत आणि उपचारातील बदल यामध्‍ये गुणवत्‍तापूर्ण सुधारणा

नवजात बालकांसाठी विशेष काळजी कक्ष (SNCU)

  • महाराष्‍ट्राचा बालमृत्‍यु दर कमी करण्‍यासाठी विशेष काळजी कक्ष ही सर्वात महत्‍वाची उपाययोजना
  • एकूण अर्भक मृत्‍यु (Infant Deaths) पैकी ७१ % मृत्यु हे नवजात अर्भकांचे (Neonatal Deaths)
  • गंभीर आजारी नवजात बालकांचे मृत्‍यु टाळण्‍यासाठी ३७ विशेष काळजी कक्षाची स्‍थापना
  • प्रत्‍येक विशेष काळजी कक्ष रेडिएंट वॉर्मर, फोटो थेरिअपी युनिट , पल्‍स ऑक्सिमीटर अशा उपकरणांसह सुसज्‍ज
  • कमी वजन असणा-या बालकांसाठी कांगारु मदर केअर
  • रिअल टाईम मॉनिटरिंगसाठी विशेष ऑनलाइन सॉफ्टवेअर

बालकांची आरोग्‍य तपासणी (RBSK)

  • राज्‍यातील ०-६  वयाच्‍या बालकांची वर्षातून दोन वेळा आणि ७  ते १८ वयाच्‍या बालकांची वर्षातून एक वेळा प्रशिक्षित डॉक्‍टरांमार्फत तपासणी
  • आश्रम शाळेतील मुलांची प्रत्‍येक ३ महिन्‍यातून एक वेळा तपासणी
  • आरोग्‍य तपासणी साठी १,१९५ पथकांची स्‍थापना – प्रत्‍येक पथकामध्‍ये पुरुष व महिला डॉक्‍टर, फार्मासीस्‍ट व परिचारीका
  • बालकांचे वजन, उंची, शारिरीक व मानसिक वाढ, आजार अशा ३८ बाबींसाठी प्रतिवर्षी २ कोटी बालकांची तपासणी
  • किरकोळ आजारी बालकांना जागेवर उपचार तर गंभीर आजारी बालकांसाठी संदर्भ सेवा

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना

  • योजनेचा प्रारंभ – ०२.०७.२०१२
  • लाभार्थी – अंत्योदय, अन्नपूर्णा, केशरी, पिवळी शिधापत्रिकाधारक तसेच १४ अवर्षणग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबे व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणी जिवित बांधकाम कामगार कुटुंबे
  • विमा संरक्षण – प्रति कुटुंब प्रति वर्ष रु.लक्ष , किडनी प्रत्यारोपणाकरिता रु.२.५ लक्ष
  • उपचारांची संख्याएकूण ९७१ उपचार व शस्त्रक्रिया, ३० तज्ञ सेवा, १२१ पाठपुरावा सेवा, शासकीय रुग्णालयासाठी १३२ आरक्षित उपचार
  • लाभाची अनुज्ञेयता – लाभार्थी रुग्णाची वैध शिधापत्रिका व फोटो ओळखपत्राच्या आधारे नोंदणी. १४ अवर्षणग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिकाधारक असल्यास ७/१२ उतारा, शिधापत्रिका व फोटो ओळखपत्र आवश्यक व बांधकाम कामगार असल्यास बांधकाम कामगार मंडळाने दिलेले ओळखपत्र व फोटो ओळखपत्र
  • टोल फ्री क्र. १५५३८८/१८००-२३३-२२०० वेबसाइट – jeevandayee.gov.in

मोफत वैद्यकीय चाचण्‍या

  • मे. एचएलएल लाईफ केअर लि. यांच्यासोबत दि. ०३.०२.२०१७ पासून 5 वर्षासाठी करार आणि त्यांचेमार्फत १२५ प्रयोगशाळा कार्यान्वित
  • राज्‍यातील २,६८२ आरोग्‍य संस्‍थांमध्‍ये सुविधा उपलब्‍ध आहेत.
  • शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शहरी समुदाय आरोग्य केंद्र यामध्ये सुद्धा आता मोफत वैद्यकीय चाचण्या उपलब्ध.
  • मधुमेहाच्या रुग्णांसाठी रक्तातील साखरेचे प्रमाण शोधण्यासाठीची चाचणी उपलब्ध
  • एचएलएल मार्फत क्षयरोगाच्या रुग्णांचे नमूने प्राथमिक आरोग्य केंद्रपासून जिल्हा प्रयोगशाळेपर्यंत वाहतूक
  • DH/GH/MH/WH/Super Specialty hospitals/SDH/RH या रुग्‍णालयांमध्‍ये आपत्‍कालीन रुग्‍णांसाठी २४ तास तपासणी सेवा उपलब्ध.

मातांचे आरोग्‍य संवर्धन

  • महाराष्‍ट्र राज्‍याचा माता मृत्‍युदर 1 लाख जन्‍मामागे ५५ (२०१५ -१७) अहवालानुसार महाराष्‍ट्र माता मृत्यूचे प्रमाणात देशात दुस-या क्रमांकावर.
  • गरोदर मातांची गुणवत्‍तापूर्ण तपासणी आणि प्रथम संदर्भ केंद्रांमार्फत (ईएफआरयू) परिणामकारक सेवा यांच्यामुळे हे यश प्राप्‍त
  • राज्‍यात प्रत्‍येक ५ लाख लोकसंख्‍येस १ या प्रमाणे एकूण२६८  प्रथम संदर्भ सेवा केंद्रे (FRU) स्‍थापन करण्‍याचे नियोजन यापैकी २२६ केंद्रे कार्यान्वित व २३४  एफआरयूमध्ये रक्‍तपुरवठा
  • जागतिक आरोग्‍य संघटनेच्‍या मानकानुसार सिझेरियन प्रसूतीचे प्रमाण १५% पर्यंत असणे अपेक्षित. राज्‍यामध्‍ये शासकीय संस्‍थांमध्‍ये सदरचे प्रमाण ५%

 आजारी बालकांना संदर्भ सेवा

  • आजारी बालकांना तज्ञांमार्फत उपजिल्‍हा व जिल्‍हा रुग्‍णालयांमध्‍ये उपचार
  • अतिविशिष्‍ट उपचार आवश्‍यक असणा-या बालकांना महात्‍मा जोतिबा फुले जनआरोग्‍य योजना, मा.मुख्‍यमंत्री सहायता निधी, आरबीएसके निधी व स्‍वयंसेवी संस्‍थांमार्फत उपचार

वैद्यकीय उपकरणांची देखभाल

  • मे. फेबर सिंदूरी मॅनेजमेंट सर्विसेस प्रा.लि. यांच्यासोबत दि.१९.११.२०१६ पासून ५  वर्षासाठी करार करण्यात आलेला आहे.
  • उपकरण नादुरुस्‍त झाल्‍यास १८००-१२०-३७६७  या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्‍याची सोय आणि ७ दिवसांत दुरूस्ती. लाइफ सेव्हिंग उपकरणे दुरुस्त होईपर्यंत पर्यायी उपकरणांची सोय
  • राज्‍यातील ८५,१४३ उपकरणांची नोंद आहे.