Menu Close

आमच्या विषयी

राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग, महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य सरकारकडे स्वत:चा स्वतंत्र असा ‘राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क’ विभाग आहे. असा स्वतंत्र विभाग असणा-या काही मोजक्या राज्यांमधे महाराष्ट्राचा समावेश होतो. भारत सरकारच्या निर्देशानुसार, आरोग्य शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपक्रम, हे आरोग्य विषयक जनजागरणासाठी गरजेचे आहेत. पूर्वी राज्यात वेगवेगळे आरोग्य कार्यक्रम हे स्वतंत्रपणे राबविले जात होते. त्यामधे समन्वयाचा अभाव होता, कार्यक्रमांचे वेगवेगळेपण होते आणि अंमलबजावणीमधे त्रुटी राहात होत्या. या बाबींवर मात करण्यासाठी भारत सरकारने, राज्यामधे, एकात्मिक ‘राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क’ विभाग स्थापन केला आहे. महाराष्ट्र राज्यात आरोग्य माहिती, शिक्षण व संपर्क बळकटीकरणासाठी, राज्य शासनाने १९९६ साली, आरोग्य विभागाच्या अधिपत्याखाली, आरोग्य शिक्षण उपक्रमाच्या नियोजन, अंमलबजावणी व मूल्यमापनासाठी, शासन निर्णय N0 HEP-1096/CR/-28/FW-II दिनांक १८ जानेवारी १९९६ व्दारे, राज्यातील राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या वाढत्या गरजा भागविण्यासाठी व उपलब्ध स्रोतांच्या चांगल्या आणि प्रभावशाली वापरासाठी, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाची पुणे येथे स्थापना केली आहे.

शासन निर्णय- MMA-10B7/CR-24B/FW-II दिनांक २ सप्टेंबर १९८७ व्दारे, महाराष्ट्र सरकारने उपसंचालक (कुटुंब कल्याण विस्तार) हे पद निर्माण केले आहे आणि ते राज्याच्या ‘राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क’ विभागाचे प्रमुख आहेत. या विभागाच्या स्थापनेपासून, हा विभाग राज्याच्या आरोग्य कार्यक्रमात व आरोग्य सेवेमधे, नियोजन, अंमलबजावणी आणि आरोग्य शिक्षणाचे मूल्यमापन, माहिती व संपर्काची धोरणे, आखणी तसेच कार्यक्रम व उपक्रमांव्दारे राज्यामधे, एकात्मिक दृष्टीकोन ठेवून, राज्यातील आरोग्य कार्यक्रमास बळकटी आणत आहे. राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग हा जिल्हा स्तरावर, जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी यांच्याशी जोडला आहे. राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग, वर्तवणूक बदल संप्रेषणाचा, केंद्रबिंदू आहे.

रिसेप्शन
प्रबोधन सभागृह
कार्यालय