मुंबई, दि. ३० : संपूर्ण समाजाचा आरोग्य निर्देशांक वाढविण्याकरीता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या माध्यमातून गरजू रुग्णांनासेवा देण्याचा राज्यशासनाचा मानस आहे. यासाठी उद्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे ३४२ ठिकाणी कार्यान्वित करण्यात येणार आहेत. या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत व इतर मान्यवरांच्या हसे ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होईल. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रे १५ वा वित्त आयोग अंतर्गत स्थापित केली जाणार आहेत. शहरी भागातील एकूण लोकसंख्येपैकी साधारणतः १२,००० ते २०,००० लोकसंख्येसाठी एक याप्रमाणे हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना स्थापन केले जातील. पहिल्या टप्प्यात राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे एकूण ३४२ ठिकाणी १ मे २०२३ पासून कार्यान्वित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे सदर प्रकल्पाची लोकोपयोगीता लक्षात घेऊन सदर केंद्रांच्या संख्येत वाढ करून त्यात विनामूल्य वैद्यकीय चाचण्या, चिकित्सा व उपचार करण्यात येतील.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मध्ये खालील प्रमाणे आरोग्य सेवा उपलब्ध करूनदेण्यात येतील.१. बाह्यरुग्ण सेवा (वेळ दुपारी २.०० ते रात्री १०.००)२. मोफत औषधोपचार३. मोफत तपासणी४. टेलीकन्सल्टेशन५. गर्भवती मातांची तपासणी६. लसीकरणया केंद्रांमध्ये उपरोक्त सेवांच्या व्यतिरिक्त खालील प्रमाणे सेवा उपलब्ध करून दिल्या जातील.१) महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी२) बाह्य यंत्रणेद्वारे (M/S. HLL) रक्त तपासणीची सोय३) मानसिक आरोग्यासाठी समूपदेशन सेवा४) आवश्यकतेनुसार विशेषज्ञ संदर्भ सेवाहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केंद्रांतून रूग्णांना गरजेनुसार नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून बाह्यरुग्ण विभागातील खालील विशेषज्ञ संदर्भ सेवा विशेषज्ञांमार्फत प्रदान करण्यात येतील.१) भिषक (फिजीशियन)२) स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ३) बालरोग तज्ञ४) नेत्ररोग तज्ञ५) त्वचारोग तज्ञ६) मानसोपचार तज्ञ७) कान नाक घसा तज्ञसदर तज्ञ सेवा सायंकाळी ५.०० ते ९.०० वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात येतील. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केंद्रांमध्ये पुढील प्रमाणे मनुष्यबळाचा समावेशअसणार आहे.१) वैद्यकिय अधिकारी२) स्टाफ नर्स३) बहुउद्देशिय कर्मचारी४) अटेंडंट / गार्ड आणि५) सफाई कर्मचारी