नवी दिल्ली : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध नावीन्यपूर्ण आणि लोकोपयोगी पायाभूत सुविधा उपक्रमांची दखल हाऊसिंग अॅन्ड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. (हुडको)ने घेतली असून, २५ एप्रिल २०२३ रोजी हुडको.ने आपल्या ५३ व्या स्थापना दिनानिमित्त दिल्लीतील इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे सार्वजनिक आरोग्य विभागाला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे आरोग्य विभागाचे सचिव यांच्या वतीने श्री. अशोक आत्राम, सहसचिव आरोग्य सेवा यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री मा. श्री. हरदीप एस. पुरी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट योगदान दिले आहे. त्याचप्रमाणे सामान्य जनतेच्या आरोग्यासाठी आरोग्य विभागाने विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे पायाभूत सुविधा क्षेत्रात काम केले आहे. आरोग्य विभागाच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हुडकोने नवी दिल्लीतील इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे आपल्या 53 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित केलेल्या एका समारंभात पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.