Menu Close

सार्वजनिक आरोग्य विभागाची विक्रमी कामगिरी

पुणे – आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर दरम्यान निघालेल्या पालखी मार्गावर 6,64,607, तर पंढरपूर येथील महाआरोग्य शिबिरांमध्ये 5,00,077 अशा एकूण 11,64,684 वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचारात्मक आरोग्य सेवा पुरवून राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने विक्रमी कामगिरी केली आहे.

मा. ना. श्री. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, तसेच मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, व मा. प्रा. डॉ. तानाजी सावंत, आरोग्य मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली देहु-आळंदी ते पंढरपुर या पालखी मार्गावर आणि पंढरपूर येथे वारकऱ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी दि. 27 ते 29 जून 2023 या कालावधीत वाखरी, गोपाळपुर व ३ रस्ता येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करून आरोग्य विभागामार्फत विविध आरोग्य विषयक सेवा पुरविण्यात आल्या. प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून मंदिर परिसरामध्ये, वाळंवट ठिकाणी ३ व ६५ एकर येथे १ ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत १० बेड क्षमतेच्या अतिदक्षता विभागासह व पंढरपूर शहरामध्ये 17 ठिकाणी अशा एकूण 20 ठिकाणी मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या.

देहु-आळंदी ते पंढरपुर पालखी मार्गावर देण्यात आलेल्या आरोग्य सुविधेची वैशिष्टये:

 • देहु-आळंदी ते पंढरपुर या पालखी मार्गावर एकूण 6,64,607 वारक-यांना मोफत तपासणी व उपचार करुन आरोग्य सेवा पुरविण्यात आली.
 • प्रत्येकी दोन किलोमीटर अंतरावर 233 तात्पुरत्या ‘आपला दवाखाना’ मार्फत मोफत आरोग्य सेवा पुरविण्यात आल्या.
 • पालखी मार्गावर 24×7 अशा एकूण 194 आणि अत्यावश्यक रुग्ण सेवेसाठी 108 एकूण 75 रुग्णवाहिकांमार्फत 19,853 वारकऱ्यांना सेवा देण्यात आल्या.
 • त्यापैकी 847 अत्यावश्यक वारकऱ्यांना योग्य वेळी उपचार व संदर्भ सेवा देऊन प्राण वाचविण्यात आले. त्यामुळे मृत्यूंच्या प्रमाणात घट झाली आहे.
 • पुणे परिमंडळ, पुणे व पुणे जिल्हा परिषद स्तरावरुन पालखी बरोबर एकूण 9 आरोग्य पथके अविरत पालखी परतेपर्यन्त कार्यरत आहेत.
 • एकूण 124 आरोग्यदुतांमार्फत बाईक ॲम्बुलन्स ने पालखी मार्गावर आरोग्य सेवा पुरविण्यात आली.
 • 3,500 औषधी किटचे दिंडी प्रमुखांना मोफत किट वाटप करण्यात आले.
 • पालखी मार्गावरील ७,४६० हॉटेल्स मधील १०,४५० कामगारांची आरोग्य तपासणी तसेच पाणी नमुने तपासणी करण्यात आली.
 • पालखी मार्गावर 156 टँकरव्दारे शुध्द पाणीपुरवठा करण्यात आला. तसेच पालखी व मुक्कामाच्या ठिकाणी धुर फवारणी, पाण्याच्या सर्व स्त्रोतांचे ओटी टेस्ट तसेच आरोग्य संस्थंमार्फत जैव कचरा विल्हेवाट करण्यात आली. यामुळे पालखी मार्गावर जलजन्य व किटकजन्य उद्रेक झाला नाही.
 • पालखी मार्गावर आरोग्य विषयक जनजागृतीसाठी समाज माध्यमात, डिजीटल, प्रिंट, होर्डिंग्ज तसेच चित्ररथ मार्फत जनजागृती व संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्यात आले.

पंढरपुर येथील तिन्ही महाआरोग्य शिबिराची ठळक वैशिष्टये:

 • 3 महाआरोग्य शिबीरामध्ये व पंढरपूर मधील आपला दवाखाना (वाळवंट व इतर) दिनांक 27/06/2023 ते दिनांक 30/06/2023 या कालावधीमध्ये 5,00,077 लोकांची मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार करण्यात आले.
 • महाआरोग्य शिबिरामध्ये विषयतज्ञ, एमबीबीएस व पॅरामेडिकल स्टाफ यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 3,718 व खासगी वैद्यकीय व्यावसायिक 500 तसेच स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक 1500 असे एकूण 5,718 मनुष्यबळामार्फत मोफत आरोग्य सेवा पुरविण्यात आली.
 • महाशिबिराव्दारे नेत्रविकार, हृदयरोग, किडनी, पोटाचे विकार, त्वचेचे विकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, त्वचारोग, दंतरोग, संसर्गजन्य रोग (क्षयरोग, कुष्ठरोग), कॅन्सर या सारख्या रोगावर मोफत उपचार केलेले आहेत.
 • ज्या वारकऱ्यांना शस्त्रक्रिया व सुपरस्पेशिलिटी सेवेची आवश्यकता होती, त्यांची यादी करण्यात आली असून, सर्वांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
 • महाशिबिरातून रुग्णांच्या मोफत 40 प्रकारच्या प्रयोगशाळा तपासण्या पूर्ण केलेल्या असून, रुग्णांचा प्रयोगशाळा तपासणीचा अहवाल रुग्णांच्या मोबाईलवर देण्यात आलेला आहे.
 • रुग्णांना अतिविशेषतज्ञ मार्फत ऑन्कोलॉजी, न्युरो सर्जरी, गॅस्टोईट्रॉलॉजी यासारख्या वैद्यकीय सेवा मोफत पुरविण्यात आलेल्या आहेत.
 • मोफत नेत्र तपासणी, मोफत 77,854 चष्मे वाटप आले आहे.
 • मोतीबिंदू झालेल्या रुग्णांची यादी करुन मोफत शासकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
 • प्रत्येक शिबिराच्या ठिकाणी 05 बेड मनुष्यबळासह अतिदक्षता विभाग कार्यरत होते, त्यामध्ये 154 रुग्णांना सेवा पुरवण्यात आली व वारकऱ्यांचे प्राण वाचविले.
 • अत्याधुनिक रेडिओ डायग्नॉस्टीक सुविधा, यामध्ये सोनोग्राफी सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.
 • उपचार व आरोग्य तपासणीसाठी येणाऱ्या सर्व रुग्णांना / भाविकांना मोफत अप्लोपहार व चहा पाण्याची सोय केलेली होती.
 • मंदिर परिसरामध्ये आरोग्य दूतांमार्फत गर्दीच्या ठिकाणी बाईक ॲम्बुलन्सची सोय करण्यात आली होती.
 • महाआरोग्य शिबिराकरीता EMS 108 च्या 15 रुग्णवाहिका व आषाढी वारीसाठी 15 रुग्णवाहिका मंदिर परिसरामध्ये प्रशिक्षित मनुष्यबळासह तैनात करुन ठेवलेल्या होत्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिबिराला भेट देऊन रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांची माहिती घेतली व रुग्णांशी, डॉक्टर, कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. रुग्णांना पुरवण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांची त्यांनी प्रशंसा केली व उत्कृष्ट नियोजनाबद्दल आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे कौतुक केले. सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून सरकार आरोग्यासाठी विविध योजना राबवित आहे याचा सामान्य माणसाला फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *