Menu Close

आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी पालखीनिमित्त आरोग्य सेवांचा घेतला आढावा

आषाढी एकादशी निमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तसेच श्री संत तुकाराम महाराज पालखी या मोठ्या पालख्यांबरोबरच महाराष्ट्रभरातून येणाऱ्या अन्य सर्व पालख्यांच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर आज आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक आरोग्य विभागाची आढावा बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आली.

यावर्षी पालखी प्रस्थान लवकर होणार असल्याने उन्हाळ्याचा त्रास होऊ शकतो. यासाठी पुरेसा ओआरएसचा साठा, औषधे, पिण्याच्या पाण्याचे अधिकाधिक टँकर, पाण्याच्या स्रोतांची, पाण्याची वेळोवेळी तपासणी करावी, रुग्णवाहिकांची संख्या वाढविणे, याचबरोबर आपत्कालीन स्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्व आरोग्य पथके, यंत्रणा सज्ज ठेवाव्यात याबाबतीत सूचना देण्यात आल्या. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात औषधांची सुविधा करण्यात आली असल्याची देखील खात्री करावी.

आपत्कालीन‘108’ सेवेच्या आणि 102 सेवेच्या जास्तीत रुग्णवाहिका नियुक्त करण्यात याव्यात, दुचाकीवरुन सेवा देण्यासाठी आरोग्यदूत सुसज्ज ठेवण्यात येणार आहेत. बाह्यरुग्ण रुग्णवाहिका पथके, ग्रामीण रुग्णालयाची आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांची पालखी मुक्काम औषधोपचार केंद्रे, फिरते वैद्यकीय वैद्यकीय पथके अशी सर्व पथके आरोग्य सुविधांसाठी सज्ज करण्यात आली आहेत. अशी माहिती यावेळी उपस्थित प्रमुख अधिकाऱ्यांनी दिली.

मा. मंत्री महोदय प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी दिलेल्या सुचना :

• आषाढी वारीनिमीत्त कृती आराखडा तयार करताना महाराष्ट्रातील सर्व दिंडीमार्ग विचारात घेण्यात यावेत.
• प्रत्येक दिंडीतील वारकऱ्यांची अंदाजे संख्या नियोजन करतांना विचारात घ्यावी.
• दिंडी मार्गावार ठराविक अंतरावर पाच-दहा खाटांची तात्पुरती दवाखाने कार्यान्वित करावी.
• दिंडी मार्गातील सर्व आरोग्य संस्था मनुष्यबळ व औषधीसह सुसज्ज ठेवण्यात यावी..
• दिंडीमध्ये वाढत जाणा-या वारक-यांच्या संख्येनुसार आरोग्य सुविधा वाढविल्या जाव्यात.
• आरोग्य व्यवस्थेतील सर्व जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांची नावे ठळकपणे प्रर्दशित केली जावी.
• सर्व रुग्णवाहीकांची तपासणी करुन औषधी व इतर उपकरणे असल्याची खात्री करावी.
• उष्माघात व इतर आजारांच्या बाबतीत आवश्यक दक्षता घेण्यात यावी.
• नियोजन करतांना दिंडीमार्गाचे लहान गटांमध्ये विभाजन करुन जबाबदार अधिका-यांची नेमणुक करावी. प्रत्येक गटाचा व्हाट्सअप ग्रुप तयार करुन संपर्क यंत्रणा प्रभावीपणे राबविण्यात यावी.
• आवश्यक मनुष्यबळ राज्यातील सर्व जिल्यातून मागविण्यात यावे.
• आरोग्य विषयक सर्व कार्यक्रमांची प्रसिध्दी दिंडी मार्गावरील प्रमुख गावामध्ये करण्यात यावी.
• आषाढी पुर्वी दर आठवडयाला पुर्व तयारीची आढावा घेण्यात यावा.
• दिंडी मार्गातील सर्व रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्र पातळीवर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे कामाचे वेळापत्रक तयार करावे.
• सर्व दिंडी मार्गावर कलापथक/समुपदेशक यांचा माध्यमातुन आरोग्य विषयक प्रबोधन करण्यात यावे.
• दिंडी मार्गावरील सर्व जिल्हयात व आरोग्य संस्थात औषध व आवश्यक साहीत्य सामुग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध करावी.

यावेळी राज्यातील आरोग्य विभागातील सर्व प्रमुख अधिकारी, विभागनिहाय व जिल्हानिहाय आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *