कायाकल्प स्पर्धेत राज्य स्तरावर प्रथम क्रमांक.
उपजिल्हा रुग्णालय दर्जाचे ५० बेडचे कोल्हापूर मुख्यालयी असलेले एकमेव रुग्णालय.
सेवा रुग्णालयास ऐतिहासिक पार्श्वभूमी. रुग्णालयाला पूर्वी द व्हिक्टोरिया डायमंड ज्युबली हॉस्पिटल, असे संबोधिले जायचे. इमारतीचा पायाभरणी समारंभ १८ जून १८९७ रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत झाला होता. सैनिकांवरील उपचारासाठी रुग्णालयाचा वापर केला जात असे. त्यामुळे इन्फन्ट्री हॉस्पिटल असेही ओळखले जायचे.
रुग्णालय कायाकल्प स्पर्धेत सातत्याने सहभाग. प्रत्येक वर्षी गुणांकनामध्ये प्रगती होऊन सन २०१९ – २० मध्ये राज्य पातळीवर दुसरा क्रमांक प्राप्त. २०२० २१ मध्ये कायाकल्पमध्ये राज्यस्तरावर व्दितीय क्रमांक प्राप्त.
रुग्णालयास सलग २ वर्ष जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांकासाठी देण्यात येणारा डॉ. आनंदीबाई गौरव पुरस्कार प्राप्त. केंद्र शासनाचा लक्ष्य योजनेअंतर्गत प्रसुतीगृह व शस्त्रक्रियागृह यांना राष्ट्रीय मानांकन प्राप्त.