Menu Close

क्षयरोग मुक्त पंचायत अभियाअंतर्गत यशदा येथे राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन

पुणे, दि. २३ : आरोग्य विभाग व पंचायत राज विभाग यांच्या संयुक्त  विद्यमाने ‘क्षयरोग मुक्त भारत’ या अभियानांतर्गत सुरु असलेल्या ‘क्षयरोग मुक्त पंचायत’ या  क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत यशदा येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन क्षय रोग विभागाचे उपमहासंचालक डॉ. माथूर यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी  पंचायत राज महाराष्ट्र राज्य यांनी पंचायत राज विभागाचे अतिरिक्त उपमहासंचालक तथा संचालक आनंद भंडारी, यशदाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, राष्ट्रीय ग्रामीण विकास यंत्रणाचे सहसंचालक  डॉ. सुनीता गोलाईत, आरोग्यसेवा कुष्ठ व क्षय रोग सहसंचालक डॉ. क्षितिज खापर्डे, जागतिक आरोग्य संघटनेचे आशिष जैन, डॉ. शंकर दाबकेकर, राजेश खनके, उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर, सहायक संचालक डॉ. रामजी आडकेकर व डॉ दिगंबर कानगुले आदी उपस्थित होते. या कार्यशाळेत श्री.भंडारी यांनी पंचायत राज विभागाच्या सहभागाबद्दल मार्गदर्शन केले. श्री. कलशेट्टी यांनी ‘शाश्वत विकास ध्येय व निरोगी पंचायत’ या विषयावर मार्गदर्शन केले आणि सर्वांना क्षय मुक्त पंचायतीची शपथ दिली. तसेच श्री. खनके यांनी ग्राम पंचायत डेव्हलपमेंट प्लॅन बाबत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत क्षयरोग मुक्त गावासाठी पंचायतची भूमिका, क्षयरोग मुक्त पंचायतसाठी  आवश्यक बाबी, सर्टिफिकेशन प्रोसेस, ग्रामपंचायत विकास आराखड्यात क्षयरोग मुक्त बाबींचा समावेश, क्षयरोग मुक्त पंचायत साठी आराखडा, निरोगी गाव या विषयावर इतर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी राज्यभरातील प्राचार्य, ग्राम पंचायत प्रशिक्षण केंद्र, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), जिल्हा क्षयरोग अधिकारी व निवडक गट विकास अधिकारी, आरोग्य विभाग व पंचायत राज विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *