Menu Close

आरोग्य व माध्यमे

सार्वजनिक आरोग्य जीवनात माध्यमांची भूमिका महत्त्वाची असते. आरोग्य सेवा पुरवितांना माध्यम कौशल्य सार्वजनिक आरोग्य सेवा लोकाभिमुख करण्यासाठी महत्त्वाची ठरतात. सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा वाढविण्यासाठी त्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या डॉक्टर व इतर अधिकारी कर्मचारी यांच्यात परिवर्तनाची प्रेरणा जागृत करण्यासाठी संवाद माध्यमाच्या माध्यमातून नव चैतन्य घडविण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण हा एक अत्यंत चांगला असा उपक्रम आहे. या जाणीवेतून ‘यशदा’ येथील माध्यम क्षेत्रात कार्यरत असणारे डॉ. बबन जोगदंड यांनी सार्वजनिक आरोग्य सेवेतील डॉक्टर आणि जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी यांच्यासाठी तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले.

यात आरोग्य, मानसिक आरोग्य, माध्यमे, संगीतातून आरोग्य शिक्षण अशा विविध विषयांवर चर्चा घडवीत परिवर्तनवादी संवाद घडून आरोग्यसेवा अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी पुढाकार घेतला.

या तीन दिवसीय प्रशिक्षण यशदा येथे आयोजित केले या प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी व जिल्हा माध्यम विस्तार अधिकारी यांनी हिरिरीने सहभाग घेत माध्यमाद्वारे सार्वजनिक आरोग्य सेवा व आरोग्य संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी व आरोग्य सेवेची जनमानसातील प्रतिमा उंचावण्यासाठी मिळालेल्या ज्ञानाचा चांगला उपयोग करू असा विश्वास व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *