महाराष्ट्र राज्यामध्ये कोवीड-१९ या आजाराचे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, पुणे, ठाणे इ. शहरामधील या आजाराची रुग्णांच्या तुलनेने स्थिर होत असली तरी इतर जिल्हे आणि ग्रामीण भागामध्ये कोविड-१९ रुग्ण मोठया प्रमाणात आढळून येत आहेत. राज्याच्या अनलॉक मार्गदर्शक सुचनांनुसार हळूहळू जनजीवन पुर्वपदावर येत असून सामान्य जनतेमध्ये या आजाराची भीती कमी होत आहे. अनलॉक सुरु असताना कोरोना नियंत्रण अधिक प्रभावीपणे करण्यासाठी राज्यातील सर्व लोकसंख्येला २ वेळा भेटी देऊन आरोग्य शिक्षण, महत्त्वाचे आरोग्य संदेश संशयीत कोविड रुग्ण शोधणे तसेच मधुमेह, हृदयविकार, किडनी आजार, लठ्ठपणा यासारख्या महत्त्वाच्या Comorbid condition असणा-या व्यक्ती शोधून काढणे, अशा activities करण्यात येतील. मोहिम कालावधीमध्ये प्रत्येक व्यक्तीस आरोग्य शिक्षण व कोविड प्रतिबंधाचे संदेश देण्यात येतील. संपूर्ण मोहीम स्थानिक लोक प्रतिनिधींच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे.
मा. मुख्यमंत्री यांच्या कल्पनेतून हि विशेष मोहीम राबिवण्यात येत आहे.
१) मोहिमेचे उद्दिष्टे:
i) राज्यामध्ये गृहभेटीद्वारे संशयीत कोवीड तपासणी व उपचार.
ii) अतिजोखमीचे(Comorbid) व्यक्ती ओळखून त्यांना उपचार व कोवीड-१९ प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण.
iii) SARI/ILI रुग्णांचे गृहभेटीद्वारे सर्वेक्षण, कोवीड-१९ तपासणी आणि उपचार.
iv) गृहभेटीद्वारे प्रत्येक नागरीकांचे कोवीड-१९ बाबत आरोग्य शिक्षण.
२) मोहीम कालावधी
- स्वस्थ महाराष्ट्र मोहीम दि.१५/०९/२०२० ते दि.२५/१०/२०२० या कालावधीत घेण्यात येईल. मोहिमेची सांगता दि. २५/१०/२०२० रोजी दस-याच्या दिवशी रावणदहना सोबत कोविड दहन करुन होईल.
- मोहिमेची पहिली फेरी दि.१५/०९/२०२० ते दि.१०/१०/२०२० या कालावधीमध्ये होईल आणि दुसरी फेरी दि.१२/१०/२०२० ते दि. २४/१०/२०२० या कालावधीमध्ये होईल. पहिला फेरीचा कालावधी २२ दिवसांचा असेल तर दुस-या फेरीचा कालावधी १२ दिवसांचा असेल.
३) मोहिमेची व्याप्ती
स्वस्थ महाराष्ट्र मोहीम राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत,ग्रामपंचायत, कटकमंडळे इ. ठिकाणी राबविली जाईल. मोहिमेअंतर्गत राज्यातील गावे, वाडी, पाडे इ. मध्ये राहणा-या प्रत्येक नागरीकाची तपासणी केली जाईल व आरोग्य शिक्षण देण्यात येईल.
४) या मोहिमेतील सर्वेक्षणादरम्यान दयावयाचे संदेश
अनलॉक कालावधीमध्ये जनतेमध्ये जागरुकता यावी आणि कोवीड-१९ आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी शास्त्रशुध्द माहीती व योग्य वेळी निर्णय घेण्याची क्षमता वाढविणे आवश्यक आहे. त्यामुळे गृहभेटीदरम्यान खालील प्रमाणे संदेश दयावेत.
i) सामान्य व्यक्ती (कोविड-पूर्व व्यक्ती) सामान्य व्यक्तींनी कोवीडचा संसर्ग होण्यापासून स्वत:ला वाचविणे आवश्यक आहे. यासाठी खलीलप्रमाणे संदेश दयावेत.
- सतत मास्क घालून रहावे. मास्क शिवाय घराबाहेर पडू नये.
- दर २-३ तासांनी साबणाने स्वच्छ हात धुवावेत. हात धुण्याची सोय नसलेल्या ठिकाणी (उदा.प्रवासात) सॅनिटायझरचा वापर करावा.
- नाक, तोंड, डोळे यांना हात लाऊ नये.
- ताप आल्यास तसेच सर्दी/खोकला/घसा दुखणे, धाप लागणे, खूप थकवा येणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरीत जवळच्या Fever Clinic मध्ये जाऊन तपासणी करुन घ्यावी.
- मधुमेह, हृदयविकार, किडणी आजार, लठ्पणा इ. असल्यास दररोज तापमान मोजावे व तापमान ९८.७’F (37’ c) पेक्षा जास्त आढल्यास Fever Clinic मध्ये तपासणी करावी,सध्या सुरु असलेले आजारामधील उपचार सुरु ठेवावेत त्यात खंड पडू देऊ नये,डॉक्टरांकडून नियमित तपासणी करुन घ्यावी.
ii) कोविड -Positive व्यक्ती Home Isolation अंतर्गत घरी राहणा-या किंवा रुग्णालयातून १० दिवसानंतर ७ दिवसाचे होम आयसोलेशन मध्ये घरी असलेल्या व्यक्तींसाठी खालील संदेश दयावेत.
- सतत मास्क लावावा.
- खोलीच्या / घराबाहेर पडू नये.
- दर २ तासांनी स्वच्छ हात धुवावेत.
- स्वत्रंत टॉयलेट / बाथरुम जेवणांची भांडी वापरावीत.
- कपडे स्वतंत्रपणे धुवावेत.
- ताप आल्यास / थकवा जाणवू लागल्यास त्वरीत रुग्णालयात जावे.
iii) कोवीड होवून गेलेले व्यक्ती ( रुग्णालयातुन येवुन ७ दिवस घरी आयसोलेशन पुर्ण झालेलया व्यक्ती कोविड आजार होवून गेला तरीही स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे अशा व्यक्तींना खालील संदेश दयावेत.
- फुफ्फुसाचे फायब्रोसीस, किडनी , लिव्हर इ. मुळे कोविड-१९ आजारानंतर शारीरीक क्षमता कमी होते असे निदर्शनास आले आहे. त्यानुसार कोविड-१९ आजारातुन बरे झालेला व्यक्तींना ते पुर्वीप्रमाणेच काम करु शकतात का याची चौकशी करावी. थकवा येत असलयास तसेच दम लागत असल्यास अशा व्यक्तीस विशेषतज्ञाकडे संदर्भीत करावे.
- कोविड-१९ आजार होवुन गेला म्हणुन वैयक्तीक प्रतिबंधाच्या बाबीमध्ये दुर्लक्ष करु नये
- मधुमेह, उच्चरक्तदाब , हृदयविकार किडनी आजार इ. आजार असल्यास आजारावर वैयक्तिक सल्ल्यानुसार औषधोपचार सुरु आहे याची खात्री करावी.
- कोविड-१९ मधुन बरे झालेल्या व्यक्तीस प्लाझमा दान करावयाचा असल्यास SBTC Website ची माहीती दयावी आणि त्यासाठी संदर्भीत करावे.
या मोहिमेतून करोनाला हरविण्याच्या जनआंदोलनमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे .