Menu Close

ई-संजीवनी- वैद्यकीय सल्ला … हवा तेव्हा …हवा तिथे…

महाराष्ट्रातील जनतेस कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की, आपण आपल्या कुटुंबांची वैद्यकीय तपासणी आता घरबसल्या विनामूल्य करू शकता.

केंद्र शासनाच्या मदतीने, महाराष्ट्र राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिक आणि इतर सर्व नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा सुरू केली आहे.

आपण खाली दिलेल्या Link द्वारे Google Chrome वर किंवा अँड्रॉइड अप्लिकेशनद्वारे घरबसल्या डॉक्टरांशी सल्लामसलत करू शकतात.
* टीप *

१. रुग्ण नोंदणी करण्यासाठी – Patient Registration वर क्लिक करा.

२. तुमचा मोबाइल नंबर टाइप करा. त्यानंतर नोंदणीसाठी मोबाईलवर आलेला ओटीपी अप्लिकेशनमध्ये टाका.

3. रुग्णाची सविस्तर माहिती आणि जिल्ह्याची नोंद करून, महाराष्ट्र हब सिलेक्ट करा. त्यानंतर टोकन जनरेट वर क्लिक करून पुढील प्रक्रिया सुरू करून, मोबाईल नंबर आणि टोकन नंबर टाकून तुम्ही डॉक्टरांशी ऑनलाइन संपर्क साधू शकता.
४. आपण व्हिडिओ आणि चॅटद्वारे कोणत्याही सामान्य आजाराबाबत डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.
५. इ-प्रिस्क्रिपशन द्वारे डॉक्टर तुम्हाला औषधे आणि घ्यावयाची काळजी ह्याबाबत माहिती पाठवतील. डॉक्टरांमार्फत देण्यात आलेली औषधे, इ-प्रिस्क्रिपशन दाखवून आपण आपल्या नजीकच्या सरकारी दवाखान्यातून मोफत घेऊ शकता.

* ही सेवा पूर्णपणे विनामूल्य आहे. *

आपण सकाळी ०९:३० ते दुपारी ०१:३० व दुपारी ०३:०० ते ०५:०० ( रविवार बंद ) या वेळेत ह्या सेवेचा वापर करू शकता.

कृपया आपल्या संपर्क यादीमधील ज्येष्ठ नागरिकांना हे निवेदन पाठवा.

• केंद्र सरकारची अधिकृत वेबसाइट आहेः
https://www.esanjeevaniopd.in/

• अँड्रॉइड मोबाइल धारकांसाठी: https://play.google.com/store/apps/details?id=in.hied.esanjeevaniopd

ज्येष्ठ नागरीकांना आरोग्यादायी जीवनासाठी ही एक चांगली संधी आहे.
कृपया याचा लाभ घ्या.

तुम्हाला माहिती असलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना व इतर सामान्य नागरिकांना ह्या वैदेकीय सेवेची माहिती द्या.

* घरी रहा, सुरक्षित रहा *

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *