पुणे – 28 मे : युनिसेफ इंडियाच्या वतीने करोनाबाबतचे गैरसमज/ संकोच, कोविड अनुरुप वर्तन आणि मानसिक आरोग्य या वर जनजागृती साठी स्क्रिप्ट लेखकांचा सहभाग या विषयावर ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी युनिसेफ महाराष्ट्राच्या मुख्य अधिकारी राजेश्वरी चंद्रशेखर यांनी कार्यशाळेचा उद्देश व विविध समस्या या वर मार्गदर्शन केले. स्क्रिप्ट रायटिंगच्या माध्यमातून महिला आणि मुलांमध्ये कोविडबाबत जागृती निर्माण करण्याबाबत युनिसेफ इंडियाचे जाफरीन चौधरी यांनी मार्गदर्शन केले. युनिसेफ महाराष्ट्राचे आरोग्य अधिकारी डॉ. खणींद्र भूयान यांनी कोविडची दुसरी लाट आणि मानसिक आरोग्य या विषयावर स्क्रिप्ट लिहीण्यासाठी मार्गदर्शन केले. शेवटच्या सत्रामध्ये विष्णू सनेर, प्रियदर्शन जाधव, रसिका आगाशे, मनीषा कोरडे, अपर्णा पाडगावकर, शंतनू रोडे, वैष्णवी कानविंदे या सारख्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध पट लेखकांनी सहभाग घेऊन मार्गदर्शन केले. या वेळी डॉ. कैलास बाविस्कर, उपसंचालक, राज्य आरोग्य व शिक्षण व संपर्क विभाग, पुणे यांनी वर्तनात बदल घडविण्यासाठी स्क्रिप्ट लेखनिकांची भूमिका व महत्व विषद केले . युनिसेफच्या सोनिया सरकार यांनी सूत्रसंचालन व स्वाती मोहपात्रा आणि अलका गुप्ता यांनी कार्यशाळेचा समारोप केला.