पुणे – राज्यस्तरीय राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत दीड कोटीपेक्षा अधिक बालकांची सर्वांगीण आरोग्य तपासणी होणार असून, या मोहिमेचा शुभारंभ एका मेळाव्याद्वारे १ मार्च रोजी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांचे संकप्नेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमला मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री, सहकार आणि नागरी उड्डाण, भारत सरकार, शरद पवार, राज्यसभा सदस्य, सुनेत्रा पवार, राज्यसभा सदस्य, सुप्रिया सुळे, लोकसभा सदस्य, मा.श्रीरंग बारणे, लोकसभा सदस्य, चंद्रकांत (दादा) पाटील, मंत्री उच्च व तंत्रशिक्षण, दत्तात्रय भरणे, मंत्री, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औ. का.फ., माधुरी मिसाळ, राज्य मंत्री, नगरविकास वैद्यकीय शिक्षण, दादा भुसे, मंत्री, शालेय शिक्षण, आदिती तटकरे, मंत्री, महिला व बालविकास, नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधान परिषद, मेघना साकोरे-बोर्डीकर, राज्यमंत्री, आरोग्य व कुटुंब कल्याण, मेधा कुलकर्णी, राज्यसभा सदस्य, डॉ. अमोल कोल्हे, लोकसभा सदस्य, योगेश टिळेकर, विधान परिषद सदस्य, विजय शिवतारे, विधानसभा सदस्य, बापुसाहेब पठारे, विधानसभा सदस्य, सिध्दार्थ शिरोळे, विधानसभा सदस्य, शंकर मांडेकर, विधानसभा सदस्य, अरूण लाड विधान परिषद सदस्य, अमित गोरखे, विधान परिषद सदस्य, महेश लांडगे, विधानसभा सदस्य, सुनिल कांबळे, विधानसभा सदस्य, सुनिल शेळके विधानसभा सदस्य, शंकर जगताप विधानसभा सदस्य, उमा खापरे, विधान परिषद सदस्य, दिलीप वळसे पाटील, विधानसभा सदस्य, राहुल कुल, विधानसभा सदस्य, चेतन तुपे, विधानसभा सदस्य, बाबाजी काळे, विधानसभा सदस्य, जयंत आसगावकर, विधान परिषद सदस्य, भिमराव तापकीर विधानसभा सदस्य, अण्णा बनसोडे विधानसभा सदस्य, शरद सोनवणे विधानसभा सदस्य, हेमंत रासणे विधानसभा सदस्य, ज्ञानेश्वर कटके विधानसभा सदस्य या स्थानिक लोकप्रतिनिधींना कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
पुण्यातील इंदिरा गांधी मॉडेल स्कूल, औंध येथे या मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ होणार आहे. राज्यातील ० ते १८ वर्षापर्यंतच्या बालके तसेच किशोरवयीन मुला-मुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग, शिक्षण विभाग,आदिवासी विभाग,नगर विकास विभाग यांच्या समन्वयाने मोहीम राज्य स्तरावर राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या मोहिमेचे उद्घाटन तालुका, जिल्हा तसेच राज्य स्तरावर करण्यात येणार आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, विरेन्द्र सिंह, आरोग्य सेवा आयुक्त तथा अमगोथू श्री रंगा नायक, जितेंद्र डूडी (भा.प्र.से) जिल्हाधिकारी पुणे, चंद्रकांत पुलकुंडवार (भा.प्र.से) विभागीय आयुक्त,पुणे, गजानन पाटील (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. पुणे, डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक, आरोग्य सेवा,मुंबई, डॉ. स्वप्नील लाळे, संचालक, शहरी आरोग्य सेवा, डॉ. बबिता कमलापूरकर, अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा, पुणे, डॉ. आर. बी. पवार, उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक, पुणे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. जिल्हा आणि तालुका स्तरावर स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत या कार्यक्रमाला सुरुवात होईल.
या मोहिमेंतर्गत राज्यातील ० ते १८ वर्षे वयोगटातील साधारण १ कोटी ६६ लाख पेक्षा अधिक बालकांची आरबीएसके कार्यक्रमांतर्गत आरोग्य तपासणी होणार आहे. मोहिमेअंतर्गत मार्चअखेर राज्यातील साधारणतः ६,००० शाळांमधील एकूण १४ लाख विद्यार्थी-विद्यार्थीनींची आणि ३०,००० अंगणवाडीतील २० लाख बालकांची तपासणी करण्यात येणार आहे. प्रत्येक बालकाची सर्वांगीण तपासणी, सिस्टमॅटिक क्लिनिकल तपासणी, आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांचे रक्तदाब व तापमान मोजणी व गरजू विद्यार्थ्यांना त्वरित उपचार व संदर्भ सेवा पुरविण्यात येणार आहे. नवजात बालकांमधील जन्मजात व्यंग ओळखून आवश्यकतेनुसार त्वरित उपचार व शासकीय व आरबीएसके तसेच एमजेपीजेएवाय अंगीकृत रुग्णालयांमध्ये नि:शुल्क संदर्भ सेवा व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
रक्तक्षय, डोळ्यांचे_आजार, दंतविकार, हृदयरोग, क्षयरोग, कुष्ठरोग ई. आजारांच्या संशयित रुग्णांना ओळखून शासकीय व आरबीएसके तसेच एमजेपीजेएवाय अंगीकृत रुग्णालयांमध्ये निशुल्क संदर्भ सेवा व शस्त्रक्रिया, किशोरवयीन मुला-मुलींमधील रक्तक्षय तपासणी तसेच शारीरिक/ मानसिक आजार शोधून त्यांना आवश्यकतेनुसार शासकीय व #आरबीएसके तसेच #एमजेपीजेएवाय अंगीकृत रुग्णालयांमध्ये निशुल्क संदर्भ सेवापुरविण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्यातील सहभागी शाळा :
१ इंदिरा गांधी मॉडेल स्कूल, औंध
२ जि.प. प्रा. शाळा नं. 1 मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे
३ जि.प. प्रा. शाळा लिमटेक, ता. बारामती, जि. पुणे
४ जि.प. प्रा. शाळा, उत्रोली, ता. भोर, जि. पुणे
५. जि.प. प्रा. शाळा, गोपाळवाडी, ता. दौंड, जि. पुणे
६ रेंझिल माध्यमिक विद्यालय, खडकी, ता. हवेली, जि. पुणे
७ जि.प. प्रा. शाळा – सरस्वतीनगर, ता. इंदापूर, जि. पुणे
८. न.प. उर्दू शाळा, जुन्नर, ता. जुन्नर, जि. पुणे
९. जि.प. प्रा. शाळा खालुंब्रे, ता. खेड, जि. पुणे
१०. जि.प. प्रा. शाळा कान्हे, ता. मावळ, जि. पुणे
११. जि.प. प्रा. शाळा सुतारवाडी, ता. मुळशी, जि. पुणे
१२. इंदिरा गांधी मॉडेल स्कूल, औंध, ता. पुणे शहर, जि. पुणे
१३. जि.प. प्रा. शाळा सुपे खुर्द, ता. पुरंदर, जि. पुणे
१४. न.प. शाळा क्रमांक 6, ता. शिरूर, जि. पुणे
१५ जि.प. प्रा. शाळा वेल्हे बुद्रुक, ता. वेल्हे, जि. पुणे