Menu Close

‘दिलखुलास’ कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची मुलाखत

मुंबई, दि. २९ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास या कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एअर’ या अॅपवर सोमवार, दि. १ आणि मंगळवार दि. २ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदक उत्तरा मोने यांनी ही मुलाखत घेतली आहे.

राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती, राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आलेले मिशन कवचकुंडल’ आणि ‘मिशन युवा स्वास्थ्य’ हे अभियान, राज्यातील लसीकरणाची सद्यस्थिती, न्यू नॉर्मल लाईफस्टाईल आणि लिव्ह विथ व्हायरस ही संकल्पना, नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत राबविण्यात आलेला शंभर टक्के लसीकरणाचा उपक्रम आदी विषयांची माहिती आरोग्य मंत्री श्री. टोपे यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *