Menu Close

जागतिक आरोग्य दिनानिमित्त गुरुवारी फिट महाराष्ट्र उपक्रम

मुंबई, दि. ५ : जागतिक आरोग्य दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य विभाग व मेड स्केप इंडिया च्या वतीने फिट महाराष्ट्र उपक्रम हाती घेण्यात आला आहे. उपक्रमाचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्या हस्ते होणार आहे, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे Rajesh Tope यांनी आज सांगितले.

गेटवे ऑफ इंडिया येथे येत्या गुरुवारी, सात एप्रिलला सकाळी नऊ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, वस्त्रोद्योग तथा मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख, पर्यावरण तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित राहणार आहेत, असे श्री टोपे यांनी सांगितले.

सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, जागतिक आरोग्‍य दिन ७ एप्रिल रोजी साजरा केला जातो. मानवतेसमोरील गंभीर आरोग्य समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने World Health Organization (WHO) यंदा Our Planet, Our Health हे घोषवाक्य निश्चित केले आहे. याच पार्श्वभूमीवर कोविड 19 महामारीच्या काळात आरोग्य व्यवस्थेसमोर उभी राहिलेली आव्हाने, वाढत्या प्रदूषणामुळे मानवी जीवनावर होणारा परिणाम, जीवनशैलीमुळे उद्भवणारे आजार यांच्याबाबत जाणीव जागृती करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ७ एप्रिल २०२२ रोजी जागतिक आरोग्य दिनानिमित्त संकल्प निरोगी महाराष्ट्राचा उपक्रमाअंतर्गत बलून फेस्टिवल, ध्यान आणि आहार विषयक व्याख्यान यांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास मुंबई महानगर पालिका MyBmc आणि मेड स्केप इंडिया Medscapeindia यांचेही सहकार्य लाभत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *