राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागामार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या आरोग्यमंथन ह्या आरोग्यविषयक लेखमालिकेचे पुस्तक स्वरूप, मंगळवार दिनांक ९ जून २०२० रोजी राज्याचे आरोग्य आयुक्त डॉ अनूप कुमार यादव भा.प्र.से. व आरोग्य संचालिका डॉ साधना तायडे यांच्या शुभहस्ते औपचारिकरित्या प्रकाशित करण्यात आले. कोविड साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर यावेळी सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन करण्यात आले. आरोग्याच्या आढावा बैठकीनंतर आयोजित छोटेखानी अनावरण कार्यक्रमाप्रसंगी आरोग्य विभागाच्या मुंबई आयुक्तालयातील व व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे राज्य कार्यालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आरोग्याच्या बहुतांशी योजनांची व उपक्रमांची माहिती या पुस्तकाद्वारे उपलब्ध होणार असून आरोग्य जनजागृतीसाठी याचा चांगला वापर होऊ शकेल. सदर पुस्तक ई-बुक स्वरूपात सोशल माध्यमाव्दारे सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या पुस्तकाचा पुढील भाग देखील लवकरच सर्वांसाठी ई-बुकद्वारे उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.