कोविड19 प्रसूतिपूर्व तपासण्यांमध्ये हिमोग्लोबीन, लघवीची तपासणी,सोनोग्राफी. वजन ,उच्च रक्तदाब, शिशुची वाढ आणि त्याची प्रगती समजते तसेच रक्तगट, रक्तातील साखरेची तपासणी व एच आय व्ही ,व्ही डी आर एल या रक्ताच्या तपासण्या करण्यात येतात .
या कार्यक्रमांतर्गत जोखमीच्या तसेच अति जोखमीच्या मातांवरही ही विशेष लक्ष देऊन रक्तक्षय असणाऱ्या मातांवरही विशेष लक्ष देण्यात येते ,माहे एप्रिल महिन्यात तीव्र रक्तक्षय असणाऱ्या 3051 गरोदर मातांना उपचार देण्यात आले आहेत हे विशेष, गर्भवती मातांना आवश्यक असणाऱ्या धनुर्वात प्रतिबंधक लस , कॅल्शियम आणि जंतनाशक गोळ्या गरोदर पणात आहाराबाबत व व्यक्तिगत स्वच्छता ,गरोदरपणातील विश्रांती , कुटुंबाचा सहभाग याबाबत सल्ला व मार्गदर्शन करण्यात येते माता व बालकांची काळजी तसेच जन्मानंतरच्या पाच अत्यावश्यक सेवा जसे नवजात बालकांना झिरो पोलिओ लस , झिरो हिपॅटायटीस बी लस, तसेच बीसीजी लस , विटामिन के, एक तासाच्या आत स्तनपान या सेवा दिल्याची ही खात्री करण्यात येते .
आजारी नवजात बालकांच्या उपचारासाठी राज्यात 37 विशेष कक्ष कार्यान्वित करण्यात आली आहेत तेथे गंभीर नवजात शिशुचे उपचार व काळजी घेतली जाते .
करोना संकटाच्या काळात सर्व प्रतिबंधात्मक काळजी घेत गरोदर मातांना या सेवा सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पुरविण्यात आल्यामुळे संकट काळात लाभार्थींना मोठा आधार मिळाला आहे . आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी या साठी रात्रं दिवस अथक प्रयत्न करीत आहेत.