मुंबई, दि.२०: राज्यात आज सलग तिसऱ्या दिवशी २६ हजार ४०८ एवढ्या उच्चांकी संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून ही आतापर्यंतची सर्वोच्च संख्या आहे. आज नविन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून आज २० हजार ५९८ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ८ लाख ८४ हजार ३४१ वर पोहोचली आहे. राज्यभरातील ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. सध्या २ लाख ९१ हजार २३८ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
दरम्यान, जालन्याच्या १०७ वर्षीय आजीबाईंच्या पाठोपाठ आज कल्याण येथे १०६ वर्षांच्या आजीबाईही कोरोनाला हरवत ठणठणीत बऱ्या झाल्या आहेत. त्यांच्यावर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली येथील जम्बो रुग्णालयात उपचार सुरू होते. कोरोनामुक्त झालेल्या आजीबाई रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानत ‘आनंदी’ चेहऱ्याने घरी परतल्या.
आज निदान झालेले २०,५९८ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ४५५ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) :
मुंबई मनपा-२२०९ (४४), ठाणे- ३१३ (५), ठाणे मनपा-४०४ (६), नवी मुंबई मनपा-३६२ (८), कल्याण डोंबिवली मनपा-४७८ (१४), उल्हासनगर मनपा-६५ (१), भिवंडी निजामपूर मनपा-३८ (४), मीरा भाईंदर मनपा-२०४ (५), पालघर-१८४ (१), वसई-विरार मनपा-२६७ (३), रायगड-४१४ (६), पनवेल मनपा-२७१ (२), नाशिक-२५८ (९), नाशिक मनपा-६२० (४), मालेगाव मनपा-४३, अहमदनगर-६७८ (१४),अहमदनगर मनपा-२११ (२), धुळे-६४ (१३), धुळे मनपा-२७(८), जळगाव-६९२ (७), जळगाव मनपा-१४८ (५), नंदूरबार-११२, पुणे- १२२० (२९), पुणे मनपा-१७७४ (३७), पिंपरी चिंचवड मनपा-७३२ (१०), सोलापूर-६१६ (५), सोलापूर मनपा-८१ (१), सातारा-७७० (१४), कोल्हापूर-५५३ (८), कोल्हापूर मनपा-१८१ (३), सांगली-५२४ (१२), सांगली मिरज कुपवाड मनपा-३२१ (४), सिंधुदूर्ग-४५, रत्नागिरी-८३ (२२), औरंगाबाद-९१ (१६),औरंगाबाद मनपा-३९७ (५), जालना-१०९ (१), हिंगोली-८८ (१), परभणी-४६ (१), परभणी मनपा-४१ (१), लातूर-२२२ (१३), लातूर मनपा-११८ (५), उस्मानाबाद-१२२ (१७), बीड-१७१ (६), नांदेड-१५८ (२), नांदेड मनपा-२७७ (१), अकोला-३७ (१), अकोला मनपा-१०१ , अमरावती-८८ (४), अमरावती मनपा-१५२ (१), यवतमाळ-२७० (१), बुलढाणा-१९४ (१), वाशिम-१२० (१), नागपूर-५३५ (१९), नागपूर मनपा-१६१२ (३५), वर्धा-१३८ (१), भंडारा-१५० (९), गोंदिया-२२४ (१), चंद्रपूर-१४३ (२), चंद्रपूर मनपा-५५, गडचिरोली-५५ (३), इतर राज्य- २२ (१).
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५८ लाख ७२ हजार २४१ नमुन्यांपैकी १२ लाख ८ हजार ६४२ नमुने पॉझिटिव्ह ( २०.५८ टक्के) आले आहेत. राज्यात १८ लाख ४९ हजार २१७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार ६४४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४५५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.७ टक्के एवढा आहे.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील
मुंबई: बाधीत रुग्ण- (१,८४,४३९) बरे झालेले रुग्ण- (१,४७,८०७), मृत्यू- (८४६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३७६), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७,७८७)
ठाणे: बाधीत रुग्ण- (१,७०,६६९), बरे झालेले रुग्ण- (१,३६,४८५), मृत्यू (४५२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९,६५४)
पालघर: बाधीत रुग्ण- (३३,८६९), बरे झालेले रुग्ण- (२६,७९९), मृत्यू- (७७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६२९८)
रायगड: बाधीत रुग्ण- (४६,२२४), बरे झालेले रुग्ण-(३५,५५४), मृत्यू- (१०१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (९६५८)
रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (७५१३), बरे झालेले रुग्ण- (४४२८), मृत्यू- (२२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८६२)
सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (३०३८), बरे झालेले रुग्ण- (१६५६), मृत्यू- (५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३२५)
पुणे: बाधीत रुग्ण- (२,६१,१३५), बरे झालेले रुग्ण- (१,८१,१०३), मृत्यू- (५२६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७४,७६८)
सातारा: बाधीत रुग्ण- (३०,०३७), बरे झालेले रुग्ण- (२०,२५०), मृत्यू- (७३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (९०४८)
सांगली: बाधीत रुग्ण- (३१,५९१), बरे झालेले रुग्ण- (१९,८७८), मृत्यू- (९४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०,७६७)
कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (३७,५०८), बरे झालेले रुग्ण- (२८,२७२), मृत्यू- (११०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८१३२)
सोलापूर: बाधीत रुग्ण- (३१,४५५), बरे झालेले रुग्ण- (२२,८७९), मृत्यू- (१०४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (७५३१)
नाशिक: बाधीत रुग्ण- (६३,१७२), बरे झालेले रुग्ण- (४८,१२७), मृत्यू- (११४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३,९००)
अहमदनगर: बाधीत रुग्ण- (३५,६७६), बरे झालेले रुग्ण- (२५,८३९), मृत्यू- (५६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण-(९२६८)
जळगाव: बाधीत रुग्ण- (४२,८८१), बरे झालेले रुग्ण- (३२,७७९), मृत्यू- (११२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८९७५)
नंदूरबार: बाधीत रुग्ण- (४६७२), बरे झालेले रुग्ण- (३३७१), मृत्यू- (१११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११९०)
धुळे: बाधीत रुग्ण- (११,६३०), बरे झालेले रुग्ण- (९७९५), मृत्यू- (३०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५२४)
औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (३२,४६७), बरे झालेले रुग्ण- (२३,०८७), मृत्यू- (८३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८५४६)
जालना: बाधीत रुग्ण-(६६८६), बरे झालेले रुग्ण- (४५८६), मृत्यू- (१७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९२२)
बीड: बाधीत रुग्ण- (८५९३), बरे झालेले रुग्ण- (५३१२), मृत्यू- (२३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (३०४७)
लातूर: बाधीत रुग्ण- (१४,६६८), बरे झालेले रुग्ण- (१०,२५३), मृत्यू- (४२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३९८८)
परभणी: बाधीत रुग्ण- (४६९४), बरे झालेले रुग्ण- (२९८६), मृत्यू- (१५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५५७)
हिंगोली: बाधीत रुग्ण- (२४८९), बरे झालेले रुग्ण- (१८७६), मृत्यू- (५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५६३)
नांदेड: बाधीत रुग्ण- (१३,५२०), बरे झालेले रुग्ण (६४७४), मृत्यू- (३४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६७०४)
उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (१०,३२९), बरे झालेले रुग्ण- (७१३३), मृत्यू- (२८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९१३)
अमरावती: बाधीत रुग्ण- (१०,६४३), बरे झालेले रुग्ण- (८१०४), मृत्यू- (२१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३२२)
अकोला: बाधीत रुग्ण- (६३२३), बरे झालेले रुग्ण- (३९७१), मृत्यू- (१९९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१५२)
वाशिम: बाधीत रुग्ण- (३३९९), बरे झालेले रुग्ण- (२५२३), मृत्यू- (६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (८११)
बुलढाणा: बाधीत रुग्ण- (६४३४), बरे झालेले रुग्ण- (४२५८), मृत्यू- (१०५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१७७)
यवतमाळ: बाधीत रुग्ण- (६९३१), बरे झालेले रुग्ण- (३८६३), मृत्यू- (१४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९१९)
नागपूर: बाधीत रुग्ण- (६४,२४१), बरे झालेले रुग्ण- (४३,४६०), मृत्यू- (१६७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(५), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९,१००)
वर्धा: बाधीत रुग्ण- (२८८८), बरे झालेले रुग्ण- (१९१४), मृत्यू- (३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (९४१)
भंडारा: बाधीत रुग्ण- (४०२०), बरे झालेले रुग्ण- (१८३६), मृत्यू- (७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२११०)
गोंदिया: बाधीत रुग्ण- (४५३७), बरे झालेले रुग्ण- (२६९३), मृत्यू- (५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१७९४)
चंद्रपूर: बाधीत रुग्ण- (७४६३), बरे झालेले रुग्ण- (३३९९), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३९९६)
गडचिरोली: बाधीत रुग्ण- (१५३८), बरे झालेले रुग्ण- (११६३), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६७)
इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (१२७०), बरे झालेले रुग्ण- (४२८), मृत्यू- (११४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७२८)
एकूण: बाधीत रुग्ण-(१२,०८,६४२) बरे झालेले रुग्ण-(८,८४,३४१),मृत्यू- (३२,६७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३९२),ॲक्टीव्ह रुग्ण-(२,९१,२३८)
(टीप: आज नोंद झालेल्या एकूण ४५५ मृत्यूंपैकी २३८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १०९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १०८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १०८ मृत्यू पुणे -३१, नागपूर -१७, औरंगाबाद -१७, ठाणे -११, धुळे -९, नाशिक – ५, कोल्हापूर -४, जळगाव -३, अहमदनगर -२, बीड -२, रत्नागिरी -२, अकोला -१, भंडारा -१, परभणी -१, सांगली-१ आणि कर्नाटक -१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.आज रिकॉन्सिलिएशन प्रक्रियेमध्ये मुंबईचे २७, वसई विरार -१ आणि सिंधुदुर्ग -१ अशा २९ रुग्णांचा समावेश एकूण बाधित रुग्णांमध्ये झाल्याने बाधित रुग्णांची संख्या २९ ने वाढली आहे.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)