Menu Close

राज्यस्तरीय टी.बी. वॉर रूम चे आयुक्त आरोग्यसेवा डॉ. रामास्वामी एन यांच्या हस्ते उदघाटन

क्षयरोग दुरीकरणासाठी नियोजन,अंमलबजावणी,संनियंत्रण,पाठपुरावा याद्वारे कार्यक्रमाचे विकेंद्रीकरण करून गावपातळी पर्यंतच्या लोकांचा सहभाग मिळावा यासाठी तयार करण्यात आलेल्या टी.बी. वॉर रूम चे राज्यस्तरीय उदघाट्न आरोग्य सेवा आयुक्त डॉ.रामास्वामी एन. यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी डॉ.रामास्वामी एन. म्हणाले, क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाची प्रभावी अंबलबजावणी करण्यासाठी योग्य नियोजन, संनियंत्रण व पाठपुरावा करून हा कार्यक्रम गाव पातळीपर्यंत पोहचण्यासाठी शासकीय, खाजगी आणि स्वयंसेवी संस्था यांनी एकत्र प्रयत्न करण्यासाठी व गुणवत्ता पूर्वक आरोग्य सेवा देण्यासाठी महत्वाचा असून गाव पातळी पर्यंत संवाद वाढवून कार्यक्रमाची गती वाढविणे शक्य होईल .२०२५ पर्यंत क्षयरोग दुरीकरणाचे उद्दिष्ट साध्य होण्यासाठी सर्वानी यात सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

सन २००२५ पर्यंत क्षयरोग दुरीकरणासाठी अतंत्य महत्वकांक्षी कार्यक्रम माननीय पंतप्रधान यांच्या प्रेरणेने राबिवला जात आहे. त्यानुसार देश व राज्यपातळीवर अंमलबजावणी करण्यात येत असून आवश्यक त्या उपाय योजना करण्यात येत आहेत.

या साठी केंद्रीय क्षयरोग विभाग यांच्याकडे असे वॉर रूम उपलब्ध असून राज्यस्तरावर असे वॉर रूम तयार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. हे वॉर रूम बील मेलिंडा गेट्स फौंडेशन व क्लिंटन हेल्थ एक्सेस इनिशिएटिव्ह यांच्या सहकार्याने उभारणी पुणे येथे करण्यात आली असून लार्ज विडिओ वॉल व डॅशबोर्ड तयार करण्यात आले आहे, कार्यक्रमाशी निगडित सर्व डेटा तयार करण्यात येऊन कार्यक्रमात येणाऱ्या अडी-अडचणी, नियोजन व सहयोगी विचारमंथन करून त्यातून कार्यक्रमाच्या चांगल्या नियोजनासाठी याची मोठी मदत होणार आहे. यात खाजगी, शासकीय व स्वयंसेवी संस्थांच्या कार्यांचा आढावा घेऊन त्या नुसार कार्यप्रणाली अद्यावत करण्यावर भर देऊन, जिल्हा व तालुके यांच्याशी व्यक्तिगत संवाद होऊन दैनंदिन कामकाजात गतिमानता येऊन गुणवत्ता व सुधार करण्यासाठीच्या कृती करण्याकडे कल निर्माण होण्यास मदत होईल.

क्षयरोग दुरीकरणासाठी महाराष्ट्र राज्यात उपलबद्ध असणाऱ्या भौतिक सुविधांचा प्रभावी वापर करून कार्यक्रमाची अंबलबजावणी केल्यास निरंतर चांगले कार्य घडण्यासाठी या वॉर रूम द्वारे कार्यक्रम संबंधित आकडेवारी उपलब्ध होईल व नियमित विश्लेषण तसेच पाठपुरावा करून , प्रभावीपणे कार्य होण्यासाठी याची मदत होईल. तसेच कार्यक्रमाशी संबंधित सर्व माहिती, सूचना, निदानात्मक सुविधा, उपचारात्मक सुविधा ,डी.बी.टी योजना यांच्या विषयी रोजच्या रोज माहिती मिळून यात येणाऱ्या अडी-अडचणींविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. निक्षय अहवाल व व्यवस्थापन अहवाल मिळवणेही यामुळे अधिक सोपे होणार आहे.

या वॉर रूम मूळे क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम हा जिल्हा, तालुका व गाव पातळीवर अधिक सक्षम होणार असून नियोजन अंमलबजावणी, शासकीय, खाजगी आणि स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग वाढवून गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी आणि संनियंत्रण पाठपुरावा यासाठी महत्वाचे ठरेल असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.

या राज्यस्तरीय उदघाटन प्रसंगी आरोग्य सेवा आयुक्त डॉ.रामास्वामी एन., संचालक, आरोग्य सेवा डॉ.नितीन आंबाडेकर, सहसंचालक,आरोग्य सेवा डॉ. रामजी अडकेकर, सी.एच.आई फौंडेशन च्या श्रीमती अनन्या व बी.एम.जी.एफ फौंडेशन चे डॉ.संदीप भारस्वाडकर, डॉ.समीर कुमटा यांची उपस्थिती होती. श्रीमती मुक्त अरोरा यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *