Menu Close

आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महिन्यातून किमान दोन वेळा आरोग्य संस्थांना अचानक भेटी द्याव्यात – आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर

सार्वजनिक आरोग्य विभागातील सचिव, आयुक्त, संचालक, सहसंचालक, उपसंचालक, सहाय्यक संचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी, व जिल्हा शल्यचिकित्सक या राज्य व विभागीय स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यापासुन, महिन्यातून किमान दोन वेळा आरोग्य संस्थांना अचानक भेटी द्याव्यात अशा सूचना सार्वजनिक आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी दिल्या आहेत. या भेटी दरम्यान रुग्णालयातील स्वच्छता, सुरक्षा, परिसर स्वच्छता, रुग्णाच्या आहाराचा दर्जा, रुग्णालयात मिळणारी वागणूक, औषधांची उपलब्धता, बाह्य संस्थेद्वारे नेमलेल्या कर्मचाऱ्याना मिळणारे मानधन या बाबींची काटेकोर पाहणी करण्याचे तसेच काही अनियमितता आढळलयास संबंधितावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मी स्वतः सुद्धा आरोग्य संस्थांना अचानक भेटी देणार असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी आरोग्य सेवा आयुक्तालयात राज्यातील सर्व परिमंडळातील आरोग्य सेवेचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या आढावा बैठकीत सांगितले.

खासगी रुग्णालयाच्या तुलनेत सरकारी आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी अमुलाग्र बदल करण्याची गरज असुन, सार्वजनिक हितासाठी, सरकारी रुग्णालयाची एकूण यंत्रणा सुधारण्यासाठी एकत्रित प्रयत्न करूया असे निर्देश दिले. शासनाच्या प्रत्येक दवाखान्यात दर्जेदार सेवा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करा. सामाजिक बांधिलकी म्हणून वैद्यकीय अधिका-यांनी त्यांची पहिली नियुक्ती झालेला दवाखाना दत्तक घेवून तेथे उत्तम आरोग्य सुविध देणेबाबत प्रयत्न करावा. रुग्णांशी चांगला संवाद व दर्जेदार सेवा देऊन आरोग्य संस्थांवरील लोकांचा विश्वास दृढ करावा अशा सूचना मंत्री महोदयांनी दिल्या.

गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायद्याची कडक अमलाबजावणी करने गरजेचे आहे. या कामी खबर देणाऱ्याला एक लाखाचे बक्षीस देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे स्टिंग ऑपरेशन पथकात सहभागी सदस्याना चांगले मानधन देण्याचे निर्देश दिले, याविषयी लोकांमध्ये जागृती करावी, तसेच संबंधित समित्याना ऍक्टिव्ह करावे, सामाजिक जाणीव असलेल्या लोकांचा, सेवाभावी संस्थाचा सहभाग घ्यावा असे निर्देश मंत्री महोदय यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *