पुणे – पुणे स्थित आरोग्य कार्यक्रम कार्यालयांतील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक आणि सचिव श्री. विरेन्द्र सिंह हे दोन दिवसीय (दि. ३० आणि ३१ जानेवारी) पुणे दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्था (एनआयव्ही), जिल्ल्हा रुग्णालय औंध , क्षयरोग रुग्णालय औंध, बी. जे. मेडिकल कॉलेज, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय येथे भेटी दिल्या .सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, राज्य आरोग्य शिक्षण आणि संपर्क विभाग, एचआयएनव्हीएस, माता व बाल आरोग्य, एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रम, क्षयरोग आणि कुष्ठरोग या कार्यक्रम प्रमुख अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेतली. मा. सचिव डॉ. निपुण विनायक यांनी आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी विभागनिहाय अधिकाऱ्यांना मुद्देसूद सूचना केल्या.
डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक, मुंबई, डॉ. स्वप्नील लाळे, संचालक, राष्ट्रीय नागरी आभियान ,महेश हनशेट्टी, कक्ष अधिकारी, नारायण डोळस, सहायक कक्ष अधिकारी, सोनल गावंडे, विशेष कार्य अधिकारी आदी अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिव डॉ. निपुण विनायक आणि श्री. विरेन्द्र सिंह यांनी प्रत्येक आरोग्य कार्यक्रमाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेऊन कार्यक्रमाच्या कामकाजाविषयी माहिती जाणून घेतली आणि त्यानंतर आरोग्य सेवेचे बळकटीकरण करण्यासाठी तसेच कामगिरी सुधारण्यासाठी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही दिल्या.
