Menu Close

पूरस्थितीत आरोग्य विभाग सज्ज : नागरिकांना अखंडित आरोग्य सेवा देण्याच्या आरोग्य मंत्र्यांच्या सूचना

पूरस्थितीत आरोग्य विभाग सज्ज : नागरिकांना अखंडित आरोग्य सेवा देण्याच्या आरोग्य मंत्र्यांच्या सूचना


मुंबई – राज्यात सध्या सर्वत्र सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना अखंडित आरोग्य सेवा मिळावी यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग सज्ज आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

आरोग्य मंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आज आरोग्य भवन या संदर्भात राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली. सर्व जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि उपसंचालकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत पूरग्रस्त रुग्णांना तातडीने उपचार देणे, स्थलांतरित नागरिकांना आरोग्य शिबिरांमध्ये सुविधा उपलब्ध करून देणे, औषधांचा पुरेसा साठा ठेवणे तसेच ॲम्बुलन्स सेवा सतत सज्ज ठेवणे याबाबत स्पष्ट निर्देश आरोग्य मंत्र्यांनी दिले.

याशिवाय, राज्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना अलर्ट मोडवर राहून २४x७ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. पावसामुळे जलजन्य व साथीच्या आजारांचा प्रसार होऊ नये यासाठी सर्व आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना तत्काळ राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिली. संकटाच्या काळात नागरिकांना तातडीची मदत मिळावी हा आरोग्य विभागाचा ध्यास असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

#prakashabitkar #HealthMinister #ProtectingLives #HealthDepartment #HealthcareFirst #healthsupportforall #maharashtra