२१ जून – आंतरराष्ट्रीय योग दिन!
हे केवळ एक दिनविशेष नव्हे, तर आरोग्य, शांती आणि एकात्मतेचा जागर आहे. ‘योग’ म्हणजे शरीर, मन आणि आत्म्याचा सुंदर संगम. आजच्या धावपळीच्या युगात, योग आपल्याला स्थिरतेकडे नेते, सकारात्मकतेची दिशा दाखवते. पाच हजार वर्षांची ही भारतीय परंपरा आज जगभर पसरली आहे. ह्याच संस्कारांना स्मरून आज वि. सा. सामान्य रुग्णालय ठाणे येथे मा. संचालक, आरोग्य सेवा डॉ नितीन अंबाडेकर यांच्या अध्यक्षतेखली आणि मा. जिल्हाशल्यचिकित्सक डॉ कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक योगा दिवस जनजागृतीपर साजरा करण्यात आला.
जसे कुठल्याही पूजनाची सुरवात हे त्या परिसराला निर्मळ आणि पावन केल्याने होते तसेच सकाळी योगा ने सुरवात करणे म्हणजे शरीराचे आणि मनाचे पावित्र्य जपण्यासाठी असते. हीच स्पुर्ती घेऊन आज दिवसाची सुरवात वि. सा. सामान्य रुग्णालय ठाणे येथे योग सत्राने झाली.
या प्रसंगी मा. संचालक डॉ नितीन अंबाडेकर यांनी सर्वांना आपली सकारात्मक ऊर्जा देत मार्गदर्शन केले व मा. जिल्हाशल्यचिकित्सक डॉ कैलास पवार यांनी सर्वांना कायम उत्साही व उत्तेजित कसे राहण्याची प्रेरणा दिली.
मा. अति जिल्हाशल्यचिकित्सक डॉ धिरज महंगाडे यांनी सर्वांना निरंतर योग चालू ठेवण्याचे प्रोत्साहन दिले व दंतशल्यचिकित्सक डॉ अर्चना पवार या स्वतः एक अध्यात्मिक योगिनी असल्याने त्यांनी सर्वांना योगा चे महत्व सांगितले व एक सकारात्मक जीवनाचे मार्गदर्शन दिले. नेत्रशल्यचिकित्सक डॉ शुभांगी अंबाडेकर यांनी सध्याच्या धकाधकीच्या जीवनात स्त्रियांना त्यांच्या शारीरिक व मानसीक स्वस्थ्यासाठी योग किती महत्वाचे आहे ह्याची जनजागृती केली.
सकाळी 7.30 वाजता सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी उदंड प्रतिसाद देऊन आज योगाचे सत्र साजरे केले व असेच योगा ची जनजागृती सर्वोतपारी करण्याचे निषचय केले.
“श्वासात शक्ति, आसनात जागृती — योगानेच मिळते जीवनात समृध्दी!”