Menu Close

राज्यातील विविध आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्पांचे मा. पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन आणि राष्ट्राला समर्पण

मुंबई – सर्वसामान्य नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरविण्यासाठी केंद्र व राज्य शासना तर्फे राज्यातील आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करण्यात येत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (दि. २५ फेब्रुवारी) दुरदृष्य प्रणालीद्वारे विविध आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्पांचे भूमिपूजन आणि राष्ट्राला समर्पण करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, डॉ. मनसुख मांडविया, केंद्रीय मंत्री, आरोग्य व कुटुंब कल्याण आणि रसायने व खते, केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल, डॉ. भारती प्रवीण पवार, केंद्रीय राज्य मंत्री, आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी व्यवहार मंत्रालय, प्रो. एस. पी. बघेल, केंद्रीय राज्य मंत्री, आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी व्यवहार मंत्रालय, डॉ. मुंजपरा महेंद्रभाई, राज्यमंत्री, आयुष आणि महिला व बाल विकास, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, मिलिंद म्हैसकर, अपर मुख्य सचिव, नवीन सोना, सचिव-२, धीरज कुमार, आयुक्त, आरोग्य सेवा तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान यावेळी दुरदृष्य प्रणालीद्वारे कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणि पाहण्यासाठी https://pmindiawebcast.nic.in या लिंकला क्लिक करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम-अभिम अंतर्गत होणार खालील आरोग्य संस्थांचे भूमिपूजन आणि राष्ट्राला समर्पण

भूमिपूजन (PM-ABHIM) क्रिटिकल केअर हॉस्पिटल ब्लॉक

  • जिल्हा रुग्णालय, जि. पुणे – १०० खाटा
  • जिल्हा रुग्णालय, जि. अहमदनगर ५० खाटा
  • जिल्हा रुग्णालय, जि. बुलढाणा – ५० खाटा
  • जिल्हा रुग्णालय, जि. बीड – ५० खाटा
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, जि. नंदुरबार – ५० खाटा
    (एकूण खर्च – रु. १३५.०५ कोटी)

पीएम-अभिम अंतर्गत इंटिग्रेटेड पब्लिक हेल्थ लॅब

  • जिल्हा रुग्णालय, जि. अमरावती
    (एकूण खर्च – रु. १.२५ कोटी)

राष्ट्रीय आरोग्य अभियान

  • मुख्य इमारत आणि १४ स्टाफ क्वार्टर – प्रा. आ. केंद्र, करजगाव ता. चांदूरबाजार जि. अमरावती
  • मुख्य इमारत आणि स्टाफ क्वार्टर ग्रामीण रुग्णालय, जैताने ता. साक्री जि. धुळे
  • मुख्य इमारत आणि स्टाफ क्वार्टर प्रा. आ. केंद्र, शिराळा ता. अमरावती जि. अमरावती
  • जिल्हा वेअरहाऊस, मिटींग, डीपीएमए ऑफिस, जि. चंद्रपूर
  • स्टाफ क्वार्टर – प्रा.आ.केंद्र, ताडली ता. चंद्रपूर जि. चंद्रपूर
  • मुख्य इमारत आणि स्टाफ क्वार्टर प्रा.आ. केंद्र, गव्हाळी, ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार
  • मुख्य इमारत आणि स्टाफ क्वार्टर ग्रामीण रुग्णालय, सावदा ता. रावेर जि. जळगाव
  • मुख्य इमारत आणि स्टाफ क्वार्टर ग्रामीण रुग्णालय, किनगाव ता. यावल जि. जळगाव
    (एकूण खर्च – रु. ७७.९४ कोटी)

राष्ट्रीय आयुष अभियान

  • नवीन आयुष रुग्णालय इमारत बांधकाम, पुणे
    (एकूण खर्च – रु. 8.९९ कोटी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *