Menu Close

लोकाभिमुख आणि बदलत्या परिस्थितीस सक्षमपणे सामोरी जाणारी ‘आरोग्य व्यवस्था ‘ निर्मितीस प्राध्यान – मा. तुकाराम मुंढे, आयुक्त, आरोग्यसेवा

पुणे – आरोग्यविभाग त्याच्या सर्व भागधारकांशी प्रभावी समन्वयाने काम करेल. लोककेंद्रित आरोग्य सेवा, डेटा आधारित निर्णय घेणे आणि सक्षमकर्ता म्हणून माहिती तंत्रज्ञान चा वापर करून लोकाभिमुख कठीण आणि बदलत्या परिस्थितीस सक्षमपणे सामोरी जाणारी ‘आरोग्यव्यवस्था’ निर्मितीस प्राध्यान देणे ही काळाची गरज आहे असे मा. तुकाराम मुंढे आयुक्त, आरोग्य सेवा यांनी आरोग्य सेवेतील पुणे येथील विभाग प्रमुखांच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना सांगितले.

आयुक्तालयाच्या अंतर्गत पुणे येथील विविध विभागाचा आयुक्त यांनी आढावा घेत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
आरोग्यसेवा विषयीची माहिती अद्यावत ठेवून त्यांचा नियोजन व संस्थांच्या सेवांच्या विकासासाठी वापर करावा, आरोग्यासंबंधी ऋतू नुसार आरोग्य सेवांची तयारी ठेवावी. साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्हा व प्रत्येक तालुक्यातील परिस्थितीवर सनियंत्रण ठेवावे. रोजच्या आकडेवारीवर लक्ष ठेवून जिल्हा व प्रत्येक तालुक्यातील आरोग्य सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांची यांच्याशी समन्वय व नियंत्रण ठेवून पाठपुरावा करावा. जिल्हा व गाव पातळीवरील संस्थांशी चांगला संवाद ठेवून रोजचा आढावा घेतला जावा अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

आरोग्यसेवा उपक्रमांना मदत करणाऱ्या शासकीय, निमशासकीय विकासात्मक संस्थांनीही आपली भूमिका व कार्य हे कार्याची पुनरावृत्ती न होऊ देता व कार्यातील उणीवा यांचाही अभ्यास करावा असे सुचविले. सर्व भागधारकाशी प्रभावी समन्वयाने आरोग्य विभाग काम करेल असेही त्यांनी सांगितले.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आय.पी.एच.एस. (IPHS ) स्टँडर्डनुसार आरोग्य प्रणालीसाठी वापरात येणाऱ्या सहा घटकांवर आधारित, जसे देण्यात येणाऱ्या सेवा, आरोग्य सेवेतील घटक, आरोग्य माहिती प्रणाली, आवश्यक असणाऱ्या औषधांची उपलब्धता, आरोग्य प्रणाली वित्त पुरवठा, नेतृत्व व शासन या सहा घटकावर भर देण्याविषयी त्यांनी अधिकाऱ्यांना सुचित केले.

आरोग्य सेवा अधिक सक्षम व लोकाभिमुख होण्यासाठी आपला प्राधान्यक्रम असेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या बैठकीत पुणे येथील आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर व पुणे येथील सर्व विभाग प्रमुख, सहाय्यक संचालक व विकासात्मक स्वयंसेवी संस्थेचे सल्लागार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *